जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर

कराड:
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे असंघटीत क्षेत्रातील कार्यरत असंख्य कारागीर कर्मचारी, व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेलाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना जाहीर झाल्या  असून त्याचा लाभही जनतेला मिळताना दिसत आहे. परंतु, असंघटीत क्षेत्रातील काही कामगार, व्यावसायिक हे मुळ गावापासून अन्यत्र उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यास अडचण होत असल्याने ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांच्याकडे त्याठिकाणी रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य उप्ल्लाब्ध होत नाही. व्यवसाय बंद असल्याने आर्थिक आवक थांबली आहे. परिणामी अशा कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजूनही लॉकडाऊनचा सात दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत राज्यातील पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात शासनाच्या योजनेपासून वंचित राहणाऱ्या घटकांना अन्नधान्य पुरवठा करावा असे आवाहन करण्यात आले असून त्यास राज्यातील पतसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी अशा वंचित लोकांनी त्या-त्या ठिकाणच्या पतासंस्थामध्ये जाऊन आपले नाव व संपर्काचा पत्ता द्यावा. प्रत्यक्ष जाऊन नाव व पत्ता देणे शक्य नसल्यास पतसंस्थाशी संपर्क करावा. पतसंस्था अशा लोकांची यादी तयार करेल, त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याची खात्री करेल व दुसऱ्या दिवशी त्यांना पाच किलो तांदूळ, दोन किलो डाळ, एक खाद्य तेलाची पिशवी, तिखट, मीठ असे किट देण्यात येतील. त्यामुळे राज्यातील असंघटीत क्षेत्रातील कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार नाही. विविध समाजातील व्यावसायिक संघटनांनी आपल्या संबधित व्यक्तींना सदर मदत मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
    दि. यशवंत को.ऑप.बँक लि. फलटण, श्रीपार्श्वानाथ पतसंस्था कराड, छ.संभाजी महाराज पतसंस्था, पिंपोडे बु. कोरेगांव, शिवशक्ती पतसंस्था,गुजराती अर्बन, धन्वंतरी पतसंस्था सातारा, श्रीराम पतसंस्था पाटण, चैतन्य पतसंस्था, सिद्धनाथ पतसंस्था दहिवडी, अहिंसा पतसंस्था म्हसवड या संस्थांच्या सर्व शाखांमध्ये व अन्य पतसंस्थांमध्ये याबाबत संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.


*श्री.शेखर चरेगावंकर यांनी केलेल्या आवाहनास जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.
विनोद कुलकर्णी
अध्यक्ष, सातारा जिल्हा नागरी सह.पतसंस्था फेडरेशन मर्या. सातारा
संचालक, राज्य सह. पतसंस्था फेडरेशन,मुंबई.


*सहकार चळवळीचे मार्गदर्शक श्री. शेखर चरेगांवकर यांच्या आवाहनास सर्व पतसंस्थांनी गरजूंना सहकार्य करणार असल्याचे ठरविले आहे.
रामभाऊ लेंभे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचे वेलफेअर व डेव्हलपमेंट असोसिएशन,पुणे.