इस्लामपूर दि.७ प्रतिनिधी
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,व राजाराम सॉलव्हे क्स प्रा.लि.यांच्यावतीने वाळवा तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे ४०० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फिल्ड वर्क करणारे शासकीय कर्मचारी,व अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपण्या साठी त्यांना या सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे जल संपदामंत्री,व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
येथील तहसीलदार कार्यालयात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू यांच्या हस्ते तहसीलदार रवींद्र सबनीस,नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांच्याकडे हे सॅनिटायझरचे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विराज शिंदे,श्रेणीक कबाडे,तसेच व्ही. बी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने आपत्कालीन परिस्थिती त सामाजिक बांधिलकी जपत शासन, प्रशासन,व जनतेस सढळ मदत केली आहे. या उपक्रमाने ही परंपरा कायम ठेवली असल्याची भावना श्री.सबनीस यांनी व्यक्त केली.
कोरोना व्हायरस या महामारीस रोखण्यासाठी केंद्र,व राज्य सरकारने युध्द पातळीवर अनेक उपाय-योजना राबविल्या आहेत. साखर कारखान्यात उत्पादीत होत असलेल्या इथॉइल अल्कोहोलपासून सॅनिटायझर उत्पादन घेण्यास प्रोत्साहीत करणे हा त्याचाच भाग आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने अन्न,व औषध विभाग,तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने २६ मार्च रोजी मान्यता मिळाल्यानंतर ३० मार्च पासून सॅनिटायझर उत्पादन सुरू केले आहे.
फोटो ओळी- इस्लामपूर येथे तहसीलदार रवींद्र सबनीस,नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांच्याकडे सॅनिटायझर सुपूर्द करताना पी.आर. पाटील (दादा),विजयबापू पाटील. समवेत विराज शिंदे,श्रेणीक कबाडे, व्ही.बी. पाटील.